Monday, June 8, 2009

पटकन कॉल कर

.
फार राग येत आहे तुझा रेखा. कितीवेळा माफी मागायची तुला? तुझ्याशी फ्रेंडशीप ठेवणे हा काय माझा स्वार्थ आहे की काय? अगं मी लोकांचा गैरफायदाच काय पण फायदा सुध्दा कधी करून घेत नाही. उलट मी लोकांना प्रत्येकवेळी मदत करतो. सध्या माझ्या आयुष्यात फक्त 5 ते 6 व्यक्ती असे आहेत की ज्यांना मी बेस्ट फ्रेंड समजतो. त्यापैकी तुला एक मानतो. नि माझ्या चुकीमुळे ही बेस्ट फे्रंडशीप तुटत आहे, म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा माफी मागत आहे.
कदाचित याचा तूू चुकीचा अर्थ घेऊ नये म्हणून तुला काल बहिणीसमानही म्हणालो. अजुन काय करू म्हणजे तुला माझ्या मैत्रीवर विश्वास वाटेल? आणि आजच्या तारखेला मी जेही बोलतो ते मन:पासून व खरेच बोलतो हे लक्षात ठेव. यापुर्वीही तुला कधी खोटे बोललेले नाही. फक्त त्या गोष्टीशी संलग्नीत ज्या गोष्टी बोलल्या तेवढ्या सगळ्या खोट्या होत्या. पण माझी मैत्री मन:पासून होती, हे तुलाही चांगले ठाऊक आहे. ते खोटे बोलत असताना किती त्रास होत होता याची तुला कल्पना पण येणार नाही.
तुला ही गोष्ट मी सांगणार होतो, यात काहीच शंका नाही. फक्त तुझ्या स्वभावाचा अंदाज आल्यानंतर हे कळून चुकले की, आता जर मी सांगितलो तर तू कायमची तुटणार या भावनेनच मी सांगायचे धाडस करू शकलो नाही. मला माहीत होते की एकतर आपल्या मैत्रीचा अंत होईल अथवा पुनर्जन्म होईल. आणि माझा हा विश्वास कधीच ढळणार नाही की, एकना एक दिवस तू माझ्याशी बोलशीलच. हा विश्वास एवढ्यासाठी आहे की, वरून किती जरी कठोर वागलीस तरी आतून तू किती दयाळू आहेस, याची मला कल्पना आहे व माझ्या माझ्या मैत्रीवरही तेवढाच विश्वास आहे म्हणून.
तू दुसऱ्या मुलीसारखी असती ना तर गेली उडत म्हणालो असतो. एवढा मस्का मारलाच नसता. पण या सहा महिन्यात तू कशी आहेस हे जाणून माझ्या मनात तुझ्याबद्दल आदराची भावना आहे, आणि हे मी आज नाही बोलत तर यापुर्वीही अनेक वेळा बोलून दाखवले आहे. आणि अशी हिऱ्यासारखी मैत्रीण फक्त माझ्या चुकीमुळे दूर जाऊ नये. म्हणून हे रिपीटेशन.
दुसरी गोष्ट अशी की, माझ्या आयुष्यात पुर्वीपासूनच मैत्रीला खूप मोठे स्थान आहे. खूप कमी लोकांना मी जवळ करतो. तू मुलगी आहेस म्हणून असे कधीच नाही. बाकीचे जे बेस्ट फ्रेंडस (जेंटस्‌) आहेत त्यांना सुध्दा मला रोज बोलल्याशिवाय करमत नाही. तुला मागेही सांगितलं होतं की, अविनाश (पुण्याचा फ्रेंड) त्याला रात्री वेळ असतो, त्याच्याशी तर गप्पा मारताना रात्र कधी संपते ते सुध्दा कळत नाही. पण या 5-6 माणसांशिवाय (यशवंत, अविनाश, शरद, आनंद, सोनल आणि तू) दुसऱ्यांना मला स्वत:हून कधीच बोलावेसे वाटत नाही. बाकी लोकांना बोलण्यापेक्षा नि सहवास करण्यापेक्षा एकटे राहणे पसंत करतो.
ब्लॉगवर बरेच उतारे आले आहेत, जे माझ्या जुन्या दैनंदिनी डायरीतील आहेत. (त्यावरून काही गैरसमज नको म्हणून सांगितले) खरंतर ब्लॉगवर तुला काही गोष्टी सांगायच्या होत्या पण म्हणलं त्या गोष्टी आपल्या मैत्रीचा पुनर्जन्म झाल्यावरच सांगू या.................
आणखी एका गोष्टीचं फार वाईट वाटतं रेखा. जेव्हा मी मॅरीड असे सांगितले तेव्हा मला असे वाटले की, तूझ्या मनात खूप प्रश्न निर्माण होतील आणि त्या सर्व प्रश्नांचा भडीमार तू माझ्यावर करशील. पण ते असे काहीच घडले नाही. उलट तू माझ्याशी बोलणेच बंद केलेस. हे पण साहजिकच होते पण यावरून कधी कधी असं वाटतं की, फे्रंडशीप फक्त मीच केली होती, तुला माझ्या मैत्रीविषयी थोडा जरी जिव्हाळा असता तरी ते सगळे प्रश्न तू मला विचारले असते. असो. माझ्या वेदना माझ्यासोबत राहू दे. कधी कधी मी जास्तच अपेक्षा करतो. लिव्ह ईट.
मी तुला वचन देतो की, तुझा माझ्यावर अविश्वास निर्माण होईल असे कुठलेही कृत्य माझ्याकडून घडणार नाही. तुझा जेवढा विश्वास तुझा भाऊ सचिनवर आहे तेवढाच विश्वास माझ्यावर असू दे, हा विश्वास मी कधीच ढळू देणार नाही.
करणार ना फोन मग??? की अजुन शंका आहेच................. तूच ठरव मी तर किती समाऊन सांगणार आता.............
मी शेवटी पाठवलेल्या एस.एम.एस. वरून असे वाटले होते की, तू कॉल करशीलच. पण कदाचित सचिन आल्यामुळे केली नसशील. असो. मी तुझ्या फोनची वाट पाहत आहे. जे झाले गेले तो विषय आता चर्चेत पण नको. खूप वर्षे झाली तूला बोलून असे वाटत आहे, पटकन कॉल कर.
.

No comments:

Post a Comment