Wednesday, June 17, 2009

हा ब्लॉग म्हणजे......

हा ब्लॉग म्हणजे मी माझ्या मैत्रिनिशी केलेले हितगुज.....

Saturday, June 13, 2009

मोतीसुदधा लाभावा लागतो तुझ्यासारखा

एक सांगू का... मैत्री कधी ठरवून होत नाही.आपण आपल्या वाटेवरुन चालत असतोआपल्याबरोबर तसे अनेक वाटसरु असतातरस्ते फुटत असतातएकमेकात येऊन रस्ते मिसळत असतातआपल्या नकळ्त कुणाची तरी वाटआपल्या वाटेला येऊन मिळ्तेआणि नकळत आपण एकाचवाटेवरुन समांतर चालू लागतोनंतर जवळ येतोएकमेकाला आधार देतो, सोबत करतोएकमेकांची दु:खे वाटून घेतोआनंदाचे क्षण साजरे करतोमैत्री अशी होतेकाय जादू असते मैत्रीत!मैत्री शिकवते जगण्याचा खरा अर्थमैत्री बदलून टाकते आयुष्याचे सारे संदर्भमैत्री देते आपुलकी, प्रेम अन विश्वासमैत्री भारुन टाकते आपला श्वास अन श्वासकधी कधी वाटतंसमुद्राच्या काठावर शिंपल्यांची रास पडलेली असावीआपण भान विसरुन लहान मुलासारखंत्यात खेळ्त असावंशिंपलेच शिंपले...विविध रंगाचे, आकारांचे, प्रकारचे...सहजपणे त्यातला एखादा शिंपला उचलून घ्यावाअलगद उघडावाअन त्यात मोती सापडावाखर्रा खुर्रा, तुझ्यासारखाखरं सांगू का!मोतीसुदधा लाभावा लागतो तुझ्यासारखा..........

Monday, June 8, 2009

पटकन कॉल कर

.
फार राग येत आहे तुझा रेखा. कितीवेळा माफी मागायची तुला? तुझ्याशी फ्रेंडशीप ठेवणे हा काय माझा स्वार्थ आहे की काय? अगं मी लोकांचा गैरफायदाच काय पण फायदा सुध्दा कधी करून घेत नाही. उलट मी लोकांना प्रत्येकवेळी मदत करतो. सध्या माझ्या आयुष्यात फक्त 5 ते 6 व्यक्ती असे आहेत की ज्यांना मी बेस्ट फ्रेंड समजतो. त्यापैकी तुला एक मानतो. नि माझ्या चुकीमुळे ही बेस्ट फे्रंडशीप तुटत आहे, म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा माफी मागत आहे.
कदाचित याचा तूू चुकीचा अर्थ घेऊ नये म्हणून तुला काल बहिणीसमानही म्हणालो. अजुन काय करू म्हणजे तुला माझ्या मैत्रीवर विश्वास वाटेल? आणि आजच्या तारखेला मी जेही बोलतो ते मन:पासून व खरेच बोलतो हे लक्षात ठेव. यापुर्वीही तुला कधी खोटे बोललेले नाही. फक्त त्या गोष्टीशी संलग्नीत ज्या गोष्टी बोलल्या तेवढ्या सगळ्या खोट्या होत्या. पण माझी मैत्री मन:पासून होती, हे तुलाही चांगले ठाऊक आहे. ते खोटे बोलत असताना किती त्रास होत होता याची तुला कल्पना पण येणार नाही.
तुला ही गोष्ट मी सांगणार होतो, यात काहीच शंका नाही. फक्त तुझ्या स्वभावाचा अंदाज आल्यानंतर हे कळून चुकले की, आता जर मी सांगितलो तर तू कायमची तुटणार या भावनेनच मी सांगायचे धाडस करू शकलो नाही. मला माहीत होते की एकतर आपल्या मैत्रीचा अंत होईल अथवा पुनर्जन्म होईल. आणि माझा हा विश्वास कधीच ढळणार नाही की, एकना एक दिवस तू माझ्याशी बोलशीलच. हा विश्वास एवढ्यासाठी आहे की, वरून किती जरी कठोर वागलीस तरी आतून तू किती दयाळू आहेस, याची मला कल्पना आहे व माझ्या माझ्या मैत्रीवरही तेवढाच विश्वास आहे म्हणून.
तू दुसऱ्या मुलीसारखी असती ना तर गेली उडत म्हणालो असतो. एवढा मस्का मारलाच नसता. पण या सहा महिन्यात तू कशी आहेस हे जाणून माझ्या मनात तुझ्याबद्दल आदराची भावना आहे, आणि हे मी आज नाही बोलत तर यापुर्वीही अनेक वेळा बोलून दाखवले आहे. आणि अशी हिऱ्यासारखी मैत्रीण फक्त माझ्या चुकीमुळे दूर जाऊ नये. म्हणून हे रिपीटेशन.
दुसरी गोष्ट अशी की, माझ्या आयुष्यात पुर्वीपासूनच मैत्रीला खूप मोठे स्थान आहे. खूप कमी लोकांना मी जवळ करतो. तू मुलगी आहेस म्हणून असे कधीच नाही. बाकीचे जे बेस्ट फ्रेंडस (जेंटस्‌) आहेत त्यांना सुध्दा मला रोज बोलल्याशिवाय करमत नाही. तुला मागेही सांगितलं होतं की, अविनाश (पुण्याचा फ्रेंड) त्याला रात्री वेळ असतो, त्याच्याशी तर गप्पा मारताना रात्र कधी संपते ते सुध्दा कळत नाही. पण या 5-6 माणसांशिवाय (यशवंत, अविनाश, शरद, आनंद, सोनल आणि तू) दुसऱ्यांना मला स्वत:हून कधीच बोलावेसे वाटत नाही. बाकी लोकांना बोलण्यापेक्षा नि सहवास करण्यापेक्षा एकटे राहणे पसंत करतो.
ब्लॉगवर बरेच उतारे आले आहेत, जे माझ्या जुन्या दैनंदिनी डायरीतील आहेत. (त्यावरून काही गैरसमज नको म्हणून सांगितले) खरंतर ब्लॉगवर तुला काही गोष्टी सांगायच्या होत्या पण म्हणलं त्या गोष्टी आपल्या मैत्रीचा पुनर्जन्म झाल्यावरच सांगू या.................
आणखी एका गोष्टीचं फार वाईट वाटतं रेखा. जेव्हा मी मॅरीड असे सांगितले तेव्हा मला असे वाटले की, तूझ्या मनात खूप प्रश्न निर्माण होतील आणि त्या सर्व प्रश्नांचा भडीमार तू माझ्यावर करशील. पण ते असे काहीच घडले नाही. उलट तू माझ्याशी बोलणेच बंद केलेस. हे पण साहजिकच होते पण यावरून कधी कधी असं वाटतं की, फे्रंडशीप फक्त मीच केली होती, तुला माझ्या मैत्रीविषयी थोडा जरी जिव्हाळा असता तरी ते सगळे प्रश्न तू मला विचारले असते. असो. माझ्या वेदना माझ्यासोबत राहू दे. कधी कधी मी जास्तच अपेक्षा करतो. लिव्ह ईट.
मी तुला वचन देतो की, तुझा माझ्यावर अविश्वास निर्माण होईल असे कुठलेही कृत्य माझ्याकडून घडणार नाही. तुझा जेवढा विश्वास तुझा भाऊ सचिनवर आहे तेवढाच विश्वास माझ्यावर असू दे, हा विश्वास मी कधीच ढळू देणार नाही.
करणार ना फोन मग??? की अजुन शंका आहेच................. तूच ठरव मी तर किती समाऊन सांगणार आता.............
मी शेवटी पाठवलेल्या एस.एम.एस. वरून असे वाटले होते की, तू कॉल करशीलच. पण कदाचित सचिन आल्यामुळे केली नसशील. असो. मी तुझ्या फोनची वाट पाहत आहे. जे झाले गेले तो विषय आता चर्चेत पण नको. खूप वर्षे झाली तूला बोलून असे वाटत आहे, पटकन कॉल कर.
.

Friday, June 5, 2009

माझी वेदना तुझी व्हावी.


माणसांशी जवळीकता निर्माण झाली की, लक्षात येतं - हाही जीव आपल्यासारखाच दु:खी आहे. खरं म्हणजे अशी असंख्य माणसं असतील की, प्रत्येक क्षणाला त्यांच्या डोळ्यात लपून बसलेला अश्रूंचा थेंब बाहेर येऊ इच्छित असेल, डोळ्यातून मुक्त होण्यास धडपडत असेल. मात्र माणसं जाणून-बुजून स्वत:च्या अश्रूकडेच दुर्लक्ष करताना दिसतात.
मला असं वाटायचं की, हे फक्त मलाच जमतं. पण चार माणसाचं सान्निध्य लाभलं आणि माझा गैरसमज दूर झाला.
अश्रू लपवीत असताना माणूस उगाच स्वत:ला त्यागी समजत असतो. आपल्या डोळ्यातील समुद्र पाहून आपला जीवलग दु:खी होईल, असेच त्याला वाटते. पण, त्याला काय माहित की, त्याच्या जीवलगाच्या डोळ्यात तर अश्रूचा झराच आहे. जो क्षणा-क्षणाला त्याचे हृदय ओलावत आहे.
नदीचं समुद्राशी मीलन झाल्यानंतर नदीही विशाल बनते. तीच वेगळं असं अस्तीत्व उरत नाही. त्याचप्रमाणे जीवाभावाच्या माणसाच्या अश्रूत आपले अश्रू मिळाले तर आपणही एकमेकात सामावुन जाऊ.
मी त्यागी बनू शकत नाही. अश्रू लपविणे हा त्याग नसून भ्याडपणा वाटत आहे. आणि हा भ्याडपणा मला असह्य होत आहे. त्यागाची भावना दूर सारून माझे अश्रू तुझ्या अश्रूत असे मिसळावेत की, तुझे दु:ख माझे व्हावे अन्‌ माझी वेदना तुझी व्हावी.

Thursday, June 4, 2009

कधी तू माझ्याशी बोलशील?

आज अचानक तुझा एस.एम.एस. आला नि ओसाड वाळवंटात वसंत फुलावा तसे झाले. तुझ्याकडून असे घडेल याची अपेक्षाच जणू मी सोडून दिली होती. तीन दिवस झाले अन्न गोड लागत नव्हते, खाल्लेच जात नव्हते. आज दुपारी खूप दिवसानंतर जेवण करतोय की काय असे वाटले. याबद्दल शतश: धन्यवाद. मनाची तगमग थोडी शांत झाली. परमेश्वर फार दयाळू आहे, असे आमचे संत सांगतात. तो तुझ्यापेक्षा वेगळा नसावा याचा प्रत्यय आला.
काही वेळा मनात नसताना एखाद्याशी बोलावे लागते तर काही वेळा मनात असूनही एखाद्याला बोलता येत नाही. किती परस्परविरोधी घटना आहेत ना या. असो.
तुझे रुटीन चांगले चालू असेलच. नारायणच्या नावाने तू अनेक वेळा शिव्या घालायचीस, त्यापेक्षा जास्त पटीने शिव्या मला घातल्या असणार. मला राग येतो माझा स्वत:चा नि तुझाही, तू का एवढी चांगली मैत्री माझ्याशी केलीस की मला खरे बोलावे लागले.
संध्याकाळी 7 वाजले की, हात मोबाईल कडे जातोच. कधी कधी तर उगाचच रिंगटोन वाजल्याचा भास होतो. कारण एक विशिष्ट रिंगटोन तुझ्या कॉलसाठी सेट केले आहे. चुकून कुठे ते गाणे जरी वाजले तरी मन कासावीस होते. नेहमी तूझा गोड आवाज कानात घुमतो, तू माझ्याशी बोलत आहेस, काहीतरी सांगत आहेस किंवा भांडत आहेस असे वाटते.
पण, काय माहीत कधी तू माझ्याशी बोलशील??

Wednesday, June 3, 2009

Very miss u...............


आज जे संकट माझ्यासमोर उभं आहे। उद्यापर्यंत ते असेलंच असं नाही. मात्र हे संकट संपविण्याकरिता मला खूप त्रास होणार आहे, खूप यातना सहन कराव्या लागणार आहेत. उद्या हे संकट असणार नाही ही जाणीवच मला यातना सहन करण्याकरिता, संकटाशी तोंड देण्यासाठी समर्थ बनवते आणि या संकटातून तरून गेल्यानंतर मला स्वत:चं कौतुक वाटू लागतं.

जसं एखादा जख्मी दवाखान्यात गेल्यानंतर खूप घाबरतो, मात्र जखम बरी झाल्यानंतर ती सर्वांना कौतुकाने दाखवीत सुटतो, अगदी त्याचप्रमाणे........
Very miss u...............

Tuesday, June 2, 2009

कधी कधी मन खूप उदास होतं.

कधी कधी मन खूप उदास होतं. विशिष्ट असं एखादं कारणही नसतं. पण रोजच्या धावपळीमुळे शरीरासह मनही थकतं. वाटतं, कशासाठी ही एवढी धडपड? नेमकं आपणाला काय हवं आहे, काय मिळवायचं आहे, हेही आठवत नाही. प्रत्येक गोष्टीला शेवट आहे. म्हणजेच ती गोष्ट निरर्थक वाटते. जेवत असताना जेवणाऱ्या व्यक्तीला पोट भरेपर्यंतच ताटातलं अन्न प्रिय वाटतं. एकदा का त्यात हात धुतला की उरलेल्या त्या अन्नाकडे पहावंही वाटत नाही. तशीच स्थिती प्रत्येक बाबतीत होत आहे. असं वाटून नेमकं काय करायचं हेच समजत नाही. वाटतं की, आता बस्स! खूप झाली धावपळ, खूप भोगले, खूप साहिले आणि जगलेही खूप. आता अंत करावा या जीवनाचा. हा (अ)विचार संपतो न संतोच लक्षात येतं की, संध्याकाळ झाली आहे, आणि आपण देवापुढचा दिवा अजुन लावलेला नाही.
मी पटकन उठतो, दिव्यातील जुनी वात काढून टाकतो. स्वच्छ कापसाची शुभ्र नवी वात करून तेलात भिजवतो व दिवा लावतो. सारा देव्हारा प्रकाशमय ! सुंदर ! सात्वीक. त्या ज्योतीच्या लख्ख प्रकाशाने मनावरील चिंतेची काजळीही दिसेनाशी होऊ लागते.
एवढ्या छोट्याशाच गोष्टीमुळे ईश्वराचे अस्तित्व पटू लागते. आणि मी ईश्वराची विशालता आठवून दोन्ही हात जोडतो व डोळे बंद करतो.

Monday, June 1, 2009

हा ब्लॉग म्हणजे मी माझ्या मैत्रिनिशी केलेले हितगुज